Breaking News

काम करत असल्यानेच आठवेळा निवड

अहमदनगर/प्रतिनिधी 
 प्रभागातील जतनेचा विश्‍वास संपादन केला तर आपण निश्‍चितच नगरसेवक होवू शकतो. वास्तविक पाहता जनतेचे प्रश्‍न सोडवण्यात आपण आग्रेसर असल्यानेच आपणास प्रभागतील जतनेने वारंवार मतदान करुन तब्बल आठ वेळेस निवडून दिले आहे असल्याचे प्रतिपादन नगरसेकव नज्जू पहिलवान यांनी कामाचे लोकार्पण करताना केले.
आमदार संग्राम जगताप यांच्या निधीमधून बीएसएनएल रोड येथील काँग्रेटीकरण कामाचे काम पुर्ण झाल्यानंतर लेाकार्पण सोहळा नुकताच पार पडला यावेळी नगरसेकव नज्जू पहिलावर हे बोलत होते.
यावेळी हाजी नजीर चमडेवाले  मुन्ना शेठ  हारून कुरेशी शहानवाज शेख मोसिन शेख  इम्तियाज जागीरदार सोहेल शेख मुनाफ सय्यद अखलाख जागीरदार दिशान जागीरदार जहीर शेख इरफान कासम शेख आदीसह प्रभागामधील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, प्रभागातील आणि शहरातील जनता आपल्यावर प्रेम करते ती कामांचा निपटारा करतो म्हणूनच, वारंवार छोटे मोठे कामे आपण सातत्याने करत असून, प्रभागातीलच नाही तर इतर प्रभागातील प्रश्‍न देखील सोडवण्याचा आपला प्रयत्न असल्याने जनतेने आपल्याला तब्बल आठ वेळेस निवडुन दिले आहे. जतनेचे कामे आपण तत्परतेने केले तर जनता भरभरुन प्रेम देते हे आपल्याला या माध्यमातुन समजले आहे. तसेच राजकारणापेक्षा आपण समाजकार्याला जास्त मान देतो. यातुन लोकांचे प्रेम मिळते. सर्वसामान्य जनता ही दाद कोणाकडे मागणार या दृष्टीने विवंचनेत असते मात्र, त्यांच्या मदतीला आपण गेलो तर जनता आपल्याला विसरत नाही आणि योग्य काम करण्याची संधी देते असे ते म्हणाले.