Breaking News

देशातील सर्वच राज्यांमधील पोलिसांची स्थिती गंभीर- पवार

मुंबई
पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. दिल्लीमधील पोलीस सध्या अस्वस्थ आहेत. या पार्श्‍वभुमीवर त्यांनी हे विधान केले आहे.दिल्लीमध्ये कायदा व्यवस्थेचा प्रश्‍न केंद्र सरकारकडे आहे. याची दखल भारत सरकारने घेतली का ? हे माहित नाही पण त्यांनी तो गांभीर्याने घ्यावा असे ते म्हणाले.

देशातील सर्वच राज्यांमधील पोलिसांची स्थिती गंभीर आहे. 14 ते 18 तास ड्युटी करावी लागते, आठवड्याची सुट्टी देखील पोलिसांना मिळत नाही. अशा सर्व परिस्थितीत कायदा व्यवस्था संभाळण्याची जबाबदारी असणारा वर्ग डळमळीत झाला. पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी दिल्लीच्या नागरिकांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे पवार म्हणाले