Breaking News

कोरठण येथे चंपाषष्ठी महोत्सव

Korthan
अहमदनगर/प्रतिनिधी
येथील पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा येथील राज्यस्तरीय वर्ग तीर्थक्षेत्रावर सोमवारी (दि.2) भव्य चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने चंपाषष्ठी उत्सव येथील खंडोबा माळसा घोड्यावरील पितळी मूर्ती मंदिराचा 4 था वर्धापन दिन आणि स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिर 3 रा वर्धापन दिन सोहळा होईल. देवस्थान जवळ 23 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या 37 व्या वर्षाचा कीर्तन सप्ताहाची सांगता 30 नोव्हेंबरला डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
उत्सवानिमित्त वाहने पार्किंग खंडोबा फाटा आणि मंदिराच्या पूर्व बाजूला सोय करण्यात आली आहे. दि 2 डिसेंबरला खंडोबा फाटा ते मंदिर हा 1 किलोमीटर रस्ता वाहतुकीस दोन्ही बाजूने बंद राहील. यावेळी पारनेर पोलीस, नगर पोलीस मित्र संस्था यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी, अळकुटी महाविद्यालयाचे विद्यार्थी, क्रांती शुगर कारखाना सुरक्षा पथक स्वयंसेवक म्हणून सेवा करणार आहे. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी दर्शन व्यवस्था वाहने पार्किंग इत्यादी बाबींचे नियोजन करण्यात आलेले आहे
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड, चिटणीस मनीषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, विश्‍वस्त किसन मुंढे, अश्‍विनी थोरात, चंद्रभान ठुबे, मोहन घनदाट, अमर गुंजाळ, किसन धुमाळ, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, साहिबा गुंजाळ, देविदास क्षीरसागर यांनी केले आहे.