Breaking News

पॉज मशीनवर रेशन धान्य वाटपाचा फज्जा

टिळकनगर/ वार्ताहर
राज्यासह जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना अन्न धान्य वाटप प्रक्रिया पॉज मशीन मार्फतच व्हावे,  रेशनदुकांनदाराने त्यांची अंमलबजावणी करावी असा आदेश आहे. परंतु नोव्हेंबर महिन्यात पॉज मशीनचा संपूर्ण फज्जा उडाल्याचे निदर्शनास येत आहे. पॉज मशीन कासव गतीने काम करत असून, रोज सकाळी दुकानदारांनी पॉज मशिनवर माल वाटपास सुरुवात करताच मशीन बंद पडते.

 एका दिवसात मोजके बोटांवर मोजता येईल इतके कार्डधारकांनाच धान्याचा लाभ भेटत असल्याने दुकानदारांना नाईलाजास्तव अन्न धान्य वाटप बंद करावयाची वेळ येत आहे. गोर गरीब  कार्ड धारकांमध्ये शासनाने दिलेल्या पॉज मशीन बद्दल चीड निर्माण झाल्याने या मशीनी फेकून द्या, फोडून द्या पण आम्हाला अन्न धान्य वाटप करा असा नाराजीचा सुर कार्डधारकांमध्ये उमटत आहे. पॉज मशीन वारंवार बंद होणे, हँग होणे, चार्जिंग न टिकणे, रेंज नसल्याने मशीन ऑनलाइन कनेक्ट व्हायला मोट्या प्रमाणात बाधा येणे, आर.डी. सर्व्हिस नॉट रनीग अश्या एकणाऐक अडचणी मुळे अन्न धान्य वाटप बंद होत असल्याने दुकानदारांना कार्ड धारकांच्या मोठया रोषाला सामोरे जावे लागत आहे. गोर गरीबांना मिळणाऱ्या या अल्प माफक दरात भेटणाऱ्या अन्न धान्य वाटप प्रक्रियाकडे प्रशासन अत्यंत सुस्त अवस्थेत दिसत असल्याचे सर्व सामान्य लाभार्थी बोलत आहे. प्रशासनाने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे तात्काळ लक्ष घालून जो पर्यंत पॉज मशीनीचा तांत्रिक दोष दुरुस्त होत नाही तोपर्यंत पूर्वी प्रमाणे बिलावर अन्न धान्य वाटप व्हावे जेणेकरून सामान्य जनतेची पिळवणूक होणार नाही अशी मागणी कार्डधारकांमधून होत आहे.


प्रशासनाने लक्ष घालावे
 तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना पॉज मशीन वर अन्न धान्य वाटप करताना अडचणी  निर्माण होत आहे. येणाऱ्या अडचणीमुळे आम्हाला इच्छा असून देखील कार्डधारकांना माल वाटप करता येत नसल्याने विनाकारण कार्ड धारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून समस्येचे निवारण करावे अशी मागणी तालुक्यातील रेशन दुकानदारांनी केली आहे.