Breaking News

प्लास्टिक कचरा हटेना : दिवाळीत मटाके स्टॉलधारकांची बेपर्वाई; पालिकेचे दुर्लक्ष

नवी मुंबई
 यंदाची दिवाळी हरित मटाके, बिनआवाजाच्या मटाक्यांनी आणि प्लास्टिक विरहित साजरी करण्याचा संकल्प सर्वच सरकारी पातळीवर सोडण्यात आला होता. परंतु राज्यात प्लास्टिक बंदी घोषित होऊन दोन वर्षे उलटूनही दिवाळीत नवी मुंबईतील मैदानांवर प्लास्टिक कचर्‍याचे ढीग साचले आहेत.
मटाक्यांचा प्लास्टिक कचरा अद्यापही नवी मुंबई पालिकेने हटविलेला नाही.  वाशी, नेरुळ ऐरोली आणि बोनकोडे येथील मटाक्यांच्या स्टॉलधारकांनीही कचरा होणार नाही, याची काळजी घेतलेली नाही. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा पुरता मज्जा उडाल्याचे चित्र आहे.
पालिका स्वच्छता अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. नवी मुंबई महापालिकेची  स्वच्छतेसाठी देशात मान उंचावली आहे. प्लास्टिकबंदीनंतर शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी पालिकेने अनेक कठोर उपाययोजनाआखल्या होत्या. मात्र पालिकेचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. नवी मुंबईत विविध ठिकाणी पुन्हा प्लास्टिक कचरा दिसू लागला आहे. यात सर्वाधिक प्लास्टिक कचरा हा मटाके विक‘ी दुकानांच्या परिसरात विखुरलेला दिसत आहे.
दिवाळी संपल्यावर 28 ऑक्टोबरपर्यंत सर्वच दुकाने बंद झाली. मात्र तरीही अनेक ठिकाणचा हा प्लास्टिक कचरा पालिकेने उचललेला नाही. त्यामुळे हवेने हा कचरा उडून सर्वत्र विखुरला गेल्याने या दुकानांच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. या बाबत अनेकदा प्रयत्न करूनही संबंधित अधिकार्‍यांच्या प्रतिकि‘या िमळू शकल्या नाहीत.‘आपला कचरा आपली जवाबदारीम अशी घोषवाक्ये पालिकेच्या वतीने तयार करण्यात आली. त्याच्या जाहिरातीही मोठया प्रमाणावर पैसा खर्च करून करण्यात आल्या. परंतु या जाहिरातीकडे दिवाळीच्या काळात दुर्लक्ष झाले. बहुतांश ठिकाणी उभारण्यात आलेल्या मटाके दुकानदारांनी दुकाने आवरती घेताना सर्व प्लास्टिक कचरा स्टॉलच्या ठिकाणी मेकून दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या जाहिरातीचा नेमका काय परिमाण झाला, असा सवाल केला जात आहे.
विविध मटाक्यांच्या पुडक्यांना लावण्यात आलेले अतिशय पातळ आवरण आहे, जे बंदी असलेल्या  50 मायक‘ॉनहून  कमी जाडीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.  शहरात आठ नोडमध्ये सुमारे 600 मटाके दुकानांना परवानगी देण्यात आली होती. यात वाशी कोपरखैरणे नेरुळ आशा मोठया नोड मध्ये तीन पेक्षा जास्त ठिकाणी मटाका स्टॉल लावण्यात आले होते एका ठिकाणी 12 ते 45 पर्यंत मटाके स्टॉल होते. यात वाशी येथील अरेंजा कॉर्नर नजीक, बोनकोडे बस थांब्याच्या मागे, संतोषीमाता उद्यान सेक्टर 19 कोपरखैरणे, घणसोली नाल्यालगत  लावण्यात आलेले तसेच अशा बहुतांश ठिकाणी मटाका आवरणाचे प्लास्टिक मोठया प्रमाणात आजही पडून आहेत.