Breaking News

मोकाट कुत्र्यांचा बालिकेवर हल्ला

 कोल्हार/प्रतिनिधी
 प्रवरानगर येथील व्यापारी पेठेत शांतिनाथ मंगल कार्यालय समोर एका पाच वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीचे प्राण वाचले.

 प्रवरानगर कारखान्याजवळून लोणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्यापारी पेठेतील पंचवटी थेटे वस्ती, शांतिनाथ मंगल कार्यालय समोरील रस्त्यावर एका किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी सदर मुलगी जात असताना या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चार ते पाच कुत्र्यांनी या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे जवळच असणाऱ्या नागरिकांनी या मोकाट कुत्र्यांना पिटाळून लावल्याने मुलगी थोडक्यात बचावली. दररोज रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूच्या मोटरसायकलीच्या मागे ही मोकाट कुत्री लागत आहे. त्यामुळे या परिसरात असणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे व्यापारी पेठेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.