Breaking News

शिवसेना आमदारांची समुद्रकिनारी सफर

मुंबई
महाराष्ट्रात दोन आठवड्यांपासून सरकार स्थापनेसाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. भाजप-शिवसेनेचा सत्तेच्या वाटाघाटीवरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे आमदार फुटू नये म्हणून याची खबरदारी सेनेनं घेतली आहे. सर्व आमदार मुंबईत एकत्र जमले आहेत. ते सर्व सत्तासंघर्षाच्या काळातही निवांत समद्रकिनार्‍याची सफर करताना दिसत आहेत.
परवा हॉटेलवर जमलेले शिवसेना आमदार काल रंगशारदा सभागृहात दाखल झाले. तिथे उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर शिवसेना आमदारांना मालाडमधील हॉटेलवर हलवण्यात आलं. ते आज रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. कारण सेनेचे आमदार मढ बीचवर फिरायला गेले. आमदार प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी मढ बीचवर आनंद घेतला. शिवाय कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही काढून आमदार फोटो सेशन करत आहेत.