Breaking News

काद्यांच्या दराने कोलमोडले सर्वसामान्यांचे बजेट

मुंबई
देशभर कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळयांत पाणी येतांना दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणांवर नुकसान झाले असतांना, रोजच्या जगण्यातील कांद्याने शंभरी गाठल्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमोडतांना दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात अनेक शहरांत कांद्याचे भाव 40 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. विविध शहरांमध्ये कांद्याचे भाव बुधवारी 60 ते 80 रुपये किलो होते. येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव कमी होतील असा सरकारचा दावा आहे. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पुरवठ्याला विलंब होत असल्याने पुढील किमान एक महिनाभर तरी कांद्याचे दर चढेच राहतील. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 80-90 रुपये प्रति किलो आहेत. ऑक्टोबर महिन्यात 55 रुपयांपर्यंत असलेले कांद्याचे भाव आता 80 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अलवर आणि नाशिक येथून होणारी कांद्याची आवक विशेषत: कांद्याचे दर ठरवते.
महाराष्ट्रातील लासलगावसह पिंपळगाव बाजारात कांद्यांचे दर प्रचंड भडकले आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने काद्यांची आयात मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे येत्या काळात कांद्याच्या दरात घट होईल असा विश्‍वास व्यक्त करण्यात व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सरकारने सामन्यांना दिलासा दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी कांद्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. कांद्याने लासलगावसह पिंपळगाव बाजारात सहा हजाराचा टप्पा गाठला. मात्र दोन्ही बाजार समितीत कांद्याचे भाव एक हजार प्रति क्विंटलने घसरल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. तर, किरकोळ बाजारात प्रतिकिलो 70 ते 80 रुपयांच्या घरात पोहचले आहेत. मात्र लवकरच हा कांदा शंभर गाठणार आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यात कांद्यांच्या घाऊक बाजारात चारपटीनं दरात वाढ झाली आहे. दरम्यान व्यापार्‍यांनी गेल्या वर्षी कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळं दर भडकल्याचे तर, यंदा अवकाळी पावसामुळं कांद्याचे भाव वधारले आहेत.

चौकट...............
कांद्याची आयात वाढवणार
केंद्र सरकारने अफगाणिस्तान, तुर्की आणि इराणमधून कांद्याची मोठ्या प्रमाणावर आयात करणार आहे. मात्र असे असले तरी सध्या कांद्याचे दर वाढल्यामुळे सामन्यांच्या डोळयात पाणी आणले आहे. नाफेडचे प्रमुख लवकरच नाशिकमध्ये जाऊन व्यापारांशी याबाबत सविस्तर चर्चाही करणार आहेत. तर दोन आंतरराज्यमंत्री कर्नाटक आणि राजस्थानला जाणार आहेत. त्यामुळे कांद्याच्या आयातीबरोबरच साठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.