Breaking News

आंतरजातीय विवाह योजनेतील लाथार्थी दोन वर्षांपासून वंचित

Marriage
ठाणे
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरजातीय विवाहीत जोडप्यांस प्रोतसहानपर अनुदान देण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना  राबविण्यात येत आहे. मात्र, मागील दोन वर्षापासून अंतरजातीय विवाहीत जोडप्यांना देण्यात येणार्या अनुदानाचे 50 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडून अद्याप प्राप्त न झाल्याने मागील  दोन वर्षापासून 328 लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
जातीयवादाची दरी कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑगस्ट 2004 मध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना सुरु केली. देण्यात येणार्या रकमेपैकी आर्धी रक्कम विवाहितांच्या नावाने  अल्पबचतीत गुंतविण्यात येत होती. तर उर्वरित रकमेचे संसार उपयोगी साहित्य दिले जात होते. वाढती महागाई आणि बदलत्या काळानुसार पंधरा हजार रुपयांची रक्कम अत्यंत कमी  असल्याने यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा हजार रुपयांवरुन ही रक्कम पन्नास हजार करण्यात आली आहे. अस्पृश्यता निवारण्याचा योजनेचा एका भाग म्हणून  आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थीक सहाय्य देण्याची योजनाशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. दरम्यान, अंतरजातीय विवाह योजना ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने  देखील प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. एप्रिल 2015 ते मार्च 2016 या कालवधीत अंतरजातीय विवाह योजने अंतर्गत तब्बल 192 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 190 लाभार्थाना   अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 21 लाभार्थाना 15 हजार रुपया प्रमाणे तर, 169 लाभार्थाना 50 हजार रुपया प्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. मागील वर्षी  एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालवधीत अंतरजातीय विवाह योजने अंतर्गत तब्बल 137 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 137 लाभार्थाना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  तसेच एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालवधीत अंतरजातीय विवाह योजने अंतर्गत तब्बल 211 प्रस्ताव प्राप्त झाले होते.