Breaking News

मेहनतीच्या जोरावर खेळाडू नाव कमवू शकतो

अहमदनगर/प्रतिनिधी 
“शालेय जीवनात अभ्यासाबरोबर खेळालाही महत्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे. खेळामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धीक वाढ होते. खेळात हार-जीतचा विचार न करता खिलाडूवृत्तीने खेळ खेळला पाहिजे. मेहनत व कष्टाच्या जोरावर खेळाडूही नाव कमवू शकतो, हे सध्या होत असलेल्या स्पर्धांवरुन दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने सर्वतोपरि प्रयत्न केले जात आहेत’’, असे प्रतिपादन शिशू संगोपन संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांनी केले.
शिशू संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, विश्‍वस्त अ‍ॅड.विजय मुनोत, एल.के.आव्हाड, मनसूखलाल पिपाडा, मुख्याध्यापिका योगीता गांधी, जयश्री उंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.जी.शेख यांनी केले तर आभार नीता लांडगे यांनी मानले.