Breaking News

शिवसेना अजित पवारांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्यास तयार?

Ajit Devendra
मुंबई
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र तरीदेखील अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही सरसावली आहे. शिवसेना अजित पवार यांच्या मनधरणीसाठी ब्रह्मास्त्र वापरायचे ठरवले आहे.
रविवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. चर्चेचे मूळ होते ते अजित पवार. अजित पवारांचे मनधरणीचे प्रयत्न राष्ट्रवादीतल्या दिग्गज नेत्यांनी केले. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही अजित दादांच्या अशा वागण्याबाबत उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आणि अजितदादांसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवण्याचेही ठरवले आहे.
जर पवारांनी म्हटले आणि काँग्रेसला मंजूर असेल तर पाच वर्षांऐवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेना स्वीकारायला तयार झाली आहे आणि उरलेली अडीच वर्ष अजित पवारांना मुख्यमंत्रिपद देता येईल असे मत उद्धव ठाकरेंनी मांडल्याचे म्हटले जात आहे. मात्र पहिली अडीच वर्ष ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली आहे. दरम्यान भाजपने स्थापन केलेले हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीने केला आहे. त्यासाठी या तिन्ही पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली . या तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या या याचिकेवर रविवारी दुपारी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे सकाळीच ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.