Breaking News

जागतिक घुबड परिषद येत्या शुक्रवारपासून पुण्यात भरणार

Owl
पुणे
घुबड हा पक्षी अनेक भयपटातूनच आपल्यासमोर येतो आणि कदाचित त्यामुळेच त्याच्याबद्दल आपल्या मनातही एक प्रकारची वेगळी भावना तयार झाली आहे. अन्य काही पक्ष्याबद्दल आपल्याला प्रेम वाटते पण घुबड म्हटले की काहीतरी अशुभ घडणार असेच वाटू लागते. प्रत्यक्षात मात्र घुबड हा भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी वरदान ठरणारा पक्षी असून त्याबद्दलचे अनेक गैरसमज दूर करण्यास उपयोगी पडणारी जागतिक घुबड परिषद येत्या शुक्रवारपासून पुण्यात भरणार आहे. 4 दिवस चालणार्‍या या परिषदेत घुबडाविषयीचे एकंदर 46 संशोधन प्रबंध सादर होणार आहेत. भारतात प्रथमच ही परिषद होत असून त्यामुळे तरी काळी जादू आणि अन्य संशयास्पद कारणांसाठी होणारा घुबडांचा वापर कमी होण्यास मदत होईल अशी आशा करायला हरकत नाही.