Breaking News

वनकुटे येथे तरुणाची आत्महत्या

पारनेर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील 34 वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत अनिल तुळशीराम भगत यांनी पारनेर पोलिसांना खबर दिली. 27 रोजी सुनील तुळशीराम भगत वय 34 राहणार वनकुटे याने राहत्या घरात छताला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र मयत भगत यांनी रात्रीच आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर त्याच्या भाऊ अनिल भगत यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मृतदेह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी नेला. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही आत्महत्या कर्जाला कंटाळून केली आहे की त्यामागे अन्य काही कारणे आहेत याबाबत पोलीस निरीक्षक राजेश गवळी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे आदी पुढील तपास करत आहेत.