Breaking News

शिवसेना कार्यकर्त्यांनी फोडले पीक विमा कार्यालय

पुणे
कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील इफ्फो टोकिओ या विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप करत, शिवसेना कार्यकर्त्यांनी पुण्यातील विमा कंपनीचे कार्यालयाची बुधवारी तोडफोड केली. या तोडफोड प्रकरणी शिवसेना शहर पक्षप्रमुख संजय मोरे म्हणाले की, राज्यातील शेतकर्‍यांच्या हक्कांचे पैसे मिळावे. म्हणून, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पीक विम्याचे पैसे दिले जातील असे आश्‍वासन विमा कंपन्यांकडून दिले गेले होते. मात्र अद्याप देखील पैसे दिलेले नाही. त्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर पैसे द्यावे, अन्यथा आणखी तीव्र लढा उभारला जाईल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.