Breaking News

घराच्या शेडमध्ये निघाला सात फुटी साप

संगमनेर/प्रतिनिधी
घारगाव गावापासून एक किलोमीटर अंतरावर शिवारवाडी येथे बाळासाहेब कोंडीबा गुंजाळ यांच्या घरासमोरील शेडमध्ये शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सहा फुटी नागाने प्रवेश केला. यामुळे परिसरात काहीवेळ घबराट उडाली होती. सहा फुटी नागाला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिले.

 घारगाव गावापासून एक किलोमीटर अंतरावर शिवारवाडी येथे बाळासाहेब कोंडीबा गुंजाळ यांच्या घरासमोरील शेडमध्ये शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सहा फुटी नागाने प्रवेश केला. नवनाथ आहेर यांनी हा साप पाहिला. आहेर यांनी बोरबन गावातील सर्पमित्र दत्तात्रय गाडेकर यांना कळविले. गाडेकर यांनी शेडमधील खाटावर फणा काढून उभ्या असलेल्या सहा फुटी नागाला पकडले. सापाला पकडण्यासाठी नवनाथ आहेर, सुहास वाळुंज, महेश आहेर यांनी मदत केली. पकडलेल्या सहा फुटी नागालाही जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.