Breaking News

झालेल्या पंचनाम्यांचे चावडी वाचन करा:आ.काळे

कोपरगाव / ता प्रतिनिधी

 परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीचे सरसगट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पंचनामे सुरु आहेत. माञ एकही नुकसान ग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ज्या गावचे पंचनामे पूर्ण होतील त्या गावात लगेच झालेल्या पंचनाम्यांचे चावडी वाचन करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या.

 आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश, करंजी, पढेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांची अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी खिर्डी गणेश येथे कारभारी माळी यांच्या सोयाबीन व भास्कर वराडे यांच्या मका पिकाची पाहणी केली. याप्रसंगी  ग्रामसेवक सुमित गोसावी, तलाठी पी.एल.कदम, कृषी सहाय्यक प्रशांत बागल, नानासाहेब रोहोम, ज्ञानदेव रोहोम, साईनाथ खिरडकर, संजय लोखंडे, आंबादास वराडे, वसंत लोखंडे, रायभान रोहोम, निवृत्ती काळे, मच्छिद्र आहेर, रावसाहेब बावके, करंजी येथे शेतकरी गोपाल कुलकर्णी यांच्या कोंब फुटलेल्या मका पिकाच्या गंजीची पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक बाबासाहेब गुंड, कृषी सहाय्यक जी.बी.गिरासे, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक संजय आगवण, चांगदेव आगवण, कारभारी आगवण, आप्पासाहेब आगवण सह ग्रामस्थ हजर होते. पढेगाव येथे सुधाकर कदम यांच्या पिकाची पाहणी दरम्यान ग्रामसेवक शिवाजी निकम,कृषी सहाय्यक सचिन दराडे,सह भानुदास शिंदे ,गणेश दाणे,बाळासाहेब शिंदे ,दिलीप दाणे,ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.