Breaking News

मोबाईलवर बोलणं डिसेंबरपासून होणार महाग

मुंबई
मोबाईल आणि इन्टरनेट आता काळाची गरज झाली आहे. इन्टरनेट शिवाय तर कोणतेही काम करणं आता अशक्य झालं आहे. इन्टरनेटमुळे माणसाचं जगणं सोपं झालं हे खर असलं तरी, आता इन्टरनेटचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसणार आहेत. 1 डिसेंबर पासून कॉलिंग आणि इन्टरनेटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.
म्हणजेच 1 डिसेंबरपासून तेवरषेपश, खवशर, -ळीींशश्र या टेलिकॉम कंपन्यानी रिचार्चचे दर वाढवणार आहेत. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सर्वोच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या एजीआर प्रकरणावरील निर्णयानंतर दूरसंचार कंपन्यांवरील कर्जाचा दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी कॉलिंग आणि इन्टरनेटचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वोडाफोन-आयडिया-एअरटेल या कंपन्या 1 डिसेंबर 2019 पासून आपल्या दरांमध्ये वाढ करणार आहेत.