Breaking News

शिवशाही बस दरीत कोसळून एकाच मृत्यू

Accident
मुंबई
एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात एकाचा मृत्यू झाला असून झाल्याची माहिती समोर आली आहे .या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिवशाही बस पुण्याहून सांगलीच्या दिशेने चालली होती. या बसमध्ये 40 प्रवासी होते. कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना ही बस 50 फूट खोल दरीत कोसळली. अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. ही बस कात्रज ओलांडून शिंदेवाडी घाटात आल्यावर एका अवघड वळणावर चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस थेट घाटात सुमारे 50 ते 60 फुट खाली कोसळली. कोसळतांना ही बस सुमारे चार ते पाच वेळा पलटी झाली. या घटनेन एक प्रवाशी जागीच ठार झाला तर सुमारे 17 जण गंभीर जखमी झाले. मृत प्रवाशाचे नाव समजु शकले नाही. या अपघातात बसचा चक्काचुर झाला. जखमींना उपस्थित काही नागरिकांनी आणि उपचारासाठी जवळील दवाख्यान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच राजगड पोलीसा ठाण्याचे पोलीस, भारती विद्यापीठाचे पोलीस तसेच बिट मार्शल पोहचले. त्यांनी इतर जखमींना तातडीने रूग्णालयात पोहचविले.