Breaking News

राज ठाकरे टेनिस एल्बोच्या दुखापतीने त्रस्त

मुंबई
विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या प्रचारसभांनी सत्ताधार्‍यांच्या नाकीदम आणणारे मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या टेनिस एल्बोच्या दुखापतीने त्रस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी गुरूवारी राज ठाकरेंची भेट घेतली. ते कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. त्या वेळचे फोटो त्यांनी ट्विट केले आहेत.
या ट्विटमधल्या एका फोटोमध्ये राज ठाकरे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टेनिस एल्बो झाला आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांना हा त्रास होतो आहे. राज ठाकरेंच्या हाताला हा आजार झाल्याचे फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं आहे. विधानसभा निवडणुकीत राज यांनी झंझावाती प्रचार केला होता. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या, अशी मागणीही त्यांनी जनतेकडे केली होती. मात्र, तसा कौल जनतेने त्यांना दिला नाही. आज राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरे यांचं स्वागतही केलं. याचे फोटो मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करण्यात आले आहेत. त्यातल्या एका फोटोमध्ये राज ठाकरेंना टेनिस एल्बो झाल्याचं दिसत आहे.