Breaking News

सैनिकांच्या त्यागावर राष्ट्र उभे आहे:प्रा.बच्छाव

कोल्हार/प्रतिनिधी

 सैनिक हा देशातील सर्वात महत्त्वाचा घटक असून सैनिकांचे देशासाठी महत्त्वाचे योगदान आहे. सैनिकांच्या त्यागावर राष्ट्र उभे असल्याचे विचार प्राध्यापक संजय बच्छाव यांनी मांडले.
 राहता तालुक्यातील दुर्गापूर येथे 'आम्ही दुर्गापूरकर' या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी सामाजिक, शेती, आरोग्य, विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुढे बोलताना  ते म्हणाले की आम्ही दुर्गापूरकर परिवाराने सामाजिक भान ठेवत आपल्या क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिले आहे. चांगल्या गोष्टीसाठी पुढे येणे आणि चांगल्याला चांगले म्हणणे हे समाजाच्या प्रगतीचे चिन्ह आहे.
  यावेळी न्यायाधीश गुळवे, पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, भगवान लांडे, बापूसाहेब अनाप, साईप्रसाद कुंभकर्ण, प्रा .शशिकांत शिंदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक कवी यशवंत पुलाटे यांनी केले तर नियोजन प्रा. रवी जाधव, प्रा. रमेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन यमन पुलाटे यांनी तर आभार प्रा. सोमेश्वर मनकर यांनी मानले.