Breaking News

श्रीज्ञानाई साहित्य केंद्राचे उदघाटन

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील अमळनेरकर महाराज सेवा समितीच्या पुढाकाराने सावेडीत श्रीज्ञानाई रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचे उदघाटन येत्या 4 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते होणार आहे. सावेडीच्या वैदूवाडीतील जैनस्थानक परिसरात असलेल्या शिवकृपा कॉलनीतील नीलेश वेल्डींग वर्क्स या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पंढरपूरमधील चातुर्मास संपल्यावर प्रसाद महाराज अमळनेरकर यांची दिंडी परतीच्या वारीमध्ये नगरला तीन दिवस थांबणार आहे.
दि.3 ते दि.5 डिसेंबर या काळात महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात प्रसाद महाराज अमळनेरकर व दिंडी थांबणार आहेत. या दरम्यान 4 डिसेंबरला ज्ञानाई रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उदघाटन होणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेरकर महाराज सेवा समितीने केले.