Breaking News

उद्धव ठाकरेंना शपथ घेण्यापासून रोखा, सर्वोच्च न्यायालयात याचिका फेटाळली

Pramod Joshi
नवी दिल्ली
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर माहाराष्ट्रातील सत्तेचा तिढा सुटल्याचे मानले जात आहे. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस आघाडीतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करण्यात आले. परंतु, त्यांचा शपथविधी थांबवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. दरम्यान न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस नकार दिला.
याचिकेत नमूद केल्यानुसार निवडणूकपूर्व युती तोडून नव्या आघाडीचे सरकार बनवणे ही मतदारांची फसवणूक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावे अशी विनंती करण्यात आली होती. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची मंगळवारी मुंबईत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. अशा प्रकारे जनादेशाचा अवमान करणारे सरकार सत्तेत येऊ नये असे याचिकेत मंहटले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांचा मार्ग प्रशस्त झाला.