Breaking News

उल्हासनगर महापालिका शाळेत शिकणार्‍या विध्यार्थ्यांचा दोष काय?

 मनपाच्या त्या 953 शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थ्यांचा दोष तरी काय ?

उल्हासनगर
जिव धोक्यात घालून 50 वर्षे जिर्ण शाळेत घेत आहे शिक्षण. 28 शाळांपैकी उल्हासनगरमधील काही शाळांची पुर्नबांधणी सुरु झालीय खरी. शहरातील हमाल, मजूर, मोलकरणी, भंगार वेचकांची मुलं या शाळांमध्ये शिकतात. याच पार्श्‍वभूमीवर शाळा क्र. 18, 24 चीही पुर्नबांधणी सुरु झाली. मात्र, मनपा प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्या शाळेचे काम अर्ध्यावरच लटकले. तांत्रिक अधिकारी यांची मान्यता न घेतां व शहर विकास आराखड्यामध्ये रिंगरूट ने बाधित होणार्‍या तसेच शाळेच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडीट न करता ती परस्पर तोडून चूकीच्या पद्धतीने बांधण्याचा घाट काही अधिकारी यांनी घातला होता. निविदा प्रक्रिया चालू असतांनाच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तत्कालीन आयुक्त अच्युत हांगे यांना पत्र देऊन ती शाळा रिंगरूट ने बाधित होणार आहे परिणामी तुम्ही त्या गोष्टीचा विचार करून दुसर्‍या ठिकाणी ती शाळा बांधावी तसेच सर्व गोष्टींची पूर्तता झाल्या शिवाय ती शाळा तोडू नये असे सांगितले होते.
तरी देखील शिक्षण विभागातील काही अधिकार्‍यांच्या भ्रष्ट कारभारामुळे दोन सत्रात चालणार्‍या या शाळांमधील  यातील 953 विद्यार्थ्यावर परक्याच्या शाळेच्या उघड्यावर बसण्याची वेळ आल्याने पालक संतप्त झाले आहेत. म्हारळगाव, खेमानी, पंजाबी कॉलनी, आझाद नगर येथून लांबवरुन येणार्‍या विद्यार्थ्यांना आधीच शाळा दुर होती. आता तिचे आणखीनच अंतर वाढले ईतक्या लांब येताना विद्यार्थ्यांना थकवा व रहदारीचा सामना करावा लागतोय.
खेमानी,  कँप 3 मधिल अण्णाभाऊ साठे विद्यालय शाळा क्र. 18 व 24 या जुनाट शाळांची पुनर्बांधणी करण्याचा महापालिकेने तडकाफडकी निर्णय घेतला. त्यात अनेक त्रुटी व अनियमितता असतानाही मनपा प्रशासनाने 4 कोटिंची निविदा काढली. ज्यास सन 1917 -18 च्या बजेट मध्ये तत्कालीन स्थायी समितीने मान्यता ही दिली होती.
चुकीचा कार्यादेश व चुकीचे निविदे नुसार जुनी शाळा पाडून नवीन शाळा इमारत बांधण्याचे काम सुरू केले. यादरम्यान ऐन परिक्षा तोंडावर असतांना देखील शाळेतील या विद्यार्थ्यांचे स्थलांतर आवास चौकातील एस ई एस मुलिंच्या शाळेतील अक्षरशः टेरीसवर केले
शाळा चूकीच्या पध्दतीने बांधणीचे काम सुरु होताच व निवीदा प्रकीयाला मनविसे शहर अध्यक्ष मनोज शेलार याच्ंया तक्रारीमुळे ही निविदा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रद्द केली.
एसईएस शाळेतून ही या विद्यार्थ्यांचे स्थलांतर आणखी कुठे होईल की काय अशी ही स्थिती निर्माण झालीय. महापालिकेच्या चुकिची, हलगर्जीपणाची शिक्षा मात्र ते निरपराधी 953 विद्यार्थी भोगत असल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरत आहे.
या उपेक्षित विद्यार्थ्यांच्या हितासाठी मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी प्रशासन अधिकार्‍याना धारेवर धरल्यानंतर येत्या 15 दिवसात या मुलांची सुयोग्य ठिकाणी व्यवस्था करणार असल्याचे प्रशासन शिक्षण अधिकारी मोहीते यांनी आश्‍वासन दिले. तसेच मनविसेची मागणी आहे की 18 व 24 नं ची शाळा ज्या स्थितीत होती तशीच बांधून ती त्या विद्यार्थ्यांना खुली करण्यात यावी.