Breaking News

अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शिवसेनेला पाठिंबा

मुंबई
कोल्हापुरातल्या शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी पाठिंबा दिला. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता शिवसेनेचं संख्याबळ आता 64 वर गेलं आहे. राज्यातील शेतकर्‍यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्‍वास असल्यानंच शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार तसंच शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओला दुष्काळमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.