Breaking News

मिरजगाव ,माहिजळगाव परिसरात पावसाने पिकांचे नुकसान

  कर्जत/प्रतिनिधी

  कर्जत तालुक्यातील मिरजगाव व माहिजळगाव परिसरात बुधवारी रात्री सातच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सुमारे तासभर झालेल्या पावसाने नद्या, नाले,बंधारे जलमय झाले असून शेताचेही बांध मोठ्या प्रमाणात फुटले आहेत.

  जोरदार वादळी पावसामुळे शितगृहावरील व शेडनेट वरील कापड फाटल्याने यामधील पावसाचे पाणी गेल्याने राजेंद्र माने, बाबासाहेब गाडेकर, सागर पवार, रमेश म्हेत्रे, राजू कोल्हे, बाळू चिखले, सचिन चिखले, उध्दव म्हस्के, संजय पवार, गणेश पवार या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे तर कोकणगाव, तीखी, बेलगाव, माही, जळगाव, नागापूर, सीतपूर, नागलवाडी मिरजगाव याठिकाणी रब्बीच्या ज्वारी व हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले असून गेली महिनाभरापासून परतीच्या पावसातून थोड्याफार प्रमाणात वाचलेल्या खरीप पिकांची वाट लागली आहे. कापूसची बोंडे कुजून गळून गेली आहेत तर भुईमूग,तुर, ही झडून भुईसपाट झाली आहेत. कांदा,मूग,बाजरीची हातातोंडाशी आलेली पिके शेतातच कुजली आहेत,या पिकांचे नुकसान भरपाईचे पंचनामे चालू असून रब्बीच्या ज्वारी व हरभरा या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.