Breaking News

महापालिकेच्या प्रसिद्धी विभागाला भ्रष्टाचारी अ‍ॅना ‘कोंडा’चा विळखा

Ahmednagar Mahanagarpalika
अहमदनगर
महानगरपालिकेकडून वर्तमानपत्रांना देण्यात येणार्‍या जाहीरातींच्या बिलाची रक्कम अदा करण्यास येथील प्रसिद्धी विभागांचा मोठा अडसर येत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीमुळे अनेक वर्तमानपत्रांची बिले या विभागांकडून अजूनही अदा करण्यात आलेली नाही.
भ्रष्टाचाराची लागण झालेल्या महापालिकेतील कर्मचारी माध्यमांची बिले काढण्यासाठी चिरीमिरी मागणी करण्याचे किस्से चर्चीले जात असतानाच महापौर बाबासाहेब वाळके व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दर्लक्षामुळे महानगर पालिकेच्या प्रसिद्धी विभागाचे कोंडा नामक महाशयांच्या खावखुजाव प्रवृत्तीमुळे विविध वृत्तपत्रांचे जाहिरातीची लाखो रूपयाची बिले सन 2014 पासून चिरीमिरी मिळावी यासाठी रोखून धरण्यात आली आहेत. विविध वृत्तपत्रांना वर्षभरात मोठया प्रमाणात निविदा तसेच विविध स्वरूपाच्या जाहिराती शासकिय दरात दिल्या जातात. या जाहीराती छापल्यावर त्या जाहिरातीची महानगर पालिकेच्या प्रसिद्धी विभागात बिले सादर केल्यावर त्याबाबतची पुढील कार्यवाहीनंतर संबंधीत वृत्तसंस्थेला त्याबिला पोटी चेक दिला जातो, ही सर्व प्रक्रिया प्रसिद्धी  विभागामार्फत केली जाते. परंतु येथे कार्यरत असणारे कोंडा नामक अधिकारी या बिलाची रक्कम मिळवायची असेल तर मला टक्केवारी द्यावी लागेल असे सांगत असून अनेक वृत्तसंस्थांची सन 2014 पासूुन बिले जाणून बुजुन थकवण्यात आली आहेत. त्यात या प्रसिद्धी विभागाच्या अधिकार्‍यांचा व कर्मचार्‍यांचा पैसे मिळवणे हाच एकमेव उद्देश असल्याचे सिध्द होत आहे. या प्रकाराला अनेक वृत्तसंस्था वैतागल्या असून अनेकांच्या अन्यायाला वाचा फोडणार्‍या वृत्तसंस्थांवरच अन्याय होत असल्याने आधीच तुटपुंज्या स्वरूपात पैसे मिळणार्‍या या शासकीय जाहिरातीसाठी अनेक वृत्तपत्रांच्या वसुली कर्मचारी चकरा मारून बिले काढण्यासाठी थकले असून काहींनी वैतागुून वसूली साठी चकरा मारणे सोडून दिले असल्याचे कळते. सन 2014 पर्यत अगदी वेळेवर कोणतीही चिरीमिरी न देता जाहिरातीची बिले वेळेवर अदा होत असायची परंतु आता कोंडा नामक अधिकार्‍याने राजरोसपणे याठिकाणी टक्केवारी दिली तरच बिले पास होतील असा धडाका धरल्याने वृत्तसंस्था अडचणीत आल्या आहेत


अहमदनगर महानगर पालिकेचे महापौर बाबासाहेब वाळके व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दुर्लक्षामुळे महानगर पालिकेच्या प्रसिध्दी विभागाचे कोंडा नामक महाशयांच्या खावखुजाव प्रवृत्तीमुळे विविध वृत्तपत्रांचे जाहिरातीची लाखो रूपयाची बिले सन 2014 पासून चिरीमिरी मिळावी यासाठी रोखून धरण्यात आली आहेत या अन्यायाच्या विरोधात दै. लोकमंथन च्या वतीने विविध वृत्तपत्राची बिले पास व्हावीत व कोंडा नामक अधिकार्‍याला निलंबित करावे या मागणीसाठी आयुक्तांच्या तोंडाला लवकरच काळे फासण्यात येणार आहे.