Breaking News

काही मिनिटांत मिळणार पॅन कार्ड :प्राप्तिकर विभागाची नवी सेवा

PanCard
नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाकडून लवकरच काही मिनिटांत पॅनकार्ड तयार करण्याची सुविधा लॉन्च करणार आहे. यामध्ये आधार कार्डच्या माध्यामातून अर्ज करणार्‍याची माहिती घेतली जाईल. त्या माहितीमुळे पॅन कार्डच्या माहितीची पडताळणी करणं सोपं जाईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ही सुविधा पुढच्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च होईल. यामध्ये पॅन कार्ड हरवलेल्या लोकांनाही पॅन कार्ड मिळेल. काही मिनिटांमध्ये डुप्लिकेट पॅनकार्ड तयार होईल.

एका अधिकार्‍याने सांगितलं की, इलेक्ट्रॉनिक पॅन सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. शझ-छ तयार करण्यासाठी आधार कार्डच्या माहितीवरून व्हेरिफिकेशन करण्यात येईल. यासाठी तुमच्याकडे एक जढझ येईल. आधार मध्ये असलेल्या नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती ऑनलाइन अ‍ॅक्सेस केली जाईल. यासाठ पॅनकार्ड  तयार करण्यासाठी ठराविक माहिती वगळता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल.

झ-छ जनरेट झाल्यानंतर अर्जदाराला एक डिजिटल सही असलेलं शझ-छ दिलं जाईल. यामध्ये एक टठ कोड असेल. फसवणूक, डिजिटल फोटोशॉपिंग हे रोखण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती इनक्रिप्ट केली जाईल.

नव्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आठ दिवसांत 62 हजारांहून अधिक शझ-छ जारी करण्यात आली आहेत. आता देशभरात हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल. प्राप्तिकराच्या सेवा डिजिटल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असून कुठेही न जाता पॅन कार्ड तयार करून मिळेल.