Breaking News

धनुष्यबाणावर ’कमळ’, परळीतील गोपीनाथ गडावरील ’त्या’ रांगोळीची चर्चा

Rangoli
बीड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. मराठवाड्यात ओला दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. परळी येथील गोपीनाथ गडावर दर्शनासाठी जाण्याचे ठरवल्यानंतर गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवर रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळीमध्ये धनुष्यबाणावर कमळ, अशी ही रांगोळी आहे. या रांगोळीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत गोंधळ सुरू असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीवरील या रांगोळीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फुलांच्या रांगोळीच्या बाजुला ’आठवण साहेबांची’ असे लिहिले आहे. दरम्यान, दोन्ही मुंडे भगिनी परळीमध्ये नाहीत तर त्या मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे.