Breaking News

सत्तास्थापनेसाठी भाजपकडून निर्लज्ज प्रयत्न

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भाजपवर कडाडून टीका

Sonia Gandhi

नवी दिल्ली
महाराष्ट्रातील सत्ता कोणत्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात होता. भाजपने सत्तास्थापनेसाठीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी  निर्लज्ज प्रयत्न केले जात असल्याची घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केली. काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया  गांधी यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह विविध मुद्द्यांवरून भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा डाव उलटल्यामुळे मोदीशहांचा डाव अपयशी ठरला असल्याची टीका देखील गांधी यांनी यावेळी केली. भाजपकडून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा  प्रयत्न केले गेला. राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरुन काम केले. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीला अपयशी करण्यासाठी वारंवार  प्रयत्न केले गेले. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोदी-शहा सरकारचा डाव पूर्णत: अपयशी ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या प्रयत्नांना अयशस्वी करण्यासाठी शिवसेना- काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. विशेष म्हणजे आज शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसेच्या  काही  नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यामध्ये तीन पक्ष मिळून नवे सरकार स्थापन करत आले आहे. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपच्या इशाऱ्यावर काम केले.  भाजपचे हे कृत्य लज्जास्पद आहे. महाविकास आघाडी तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि शिवसेनेने राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच राज्यपालांनी काम केले यात शंकाच नाही, असे त्या म्हणाल्या. शिवसेनाकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआघाडीचे सरकार येण्यापासून रोखण्याचे सगळे प्रयत्न केले गेले. आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मोदीशहा सरकारचा पर्दाफाश झाला, असंही त्या म्हणाल्या. अहंकार आणि अतिआत्मविश्वासामुळं  भाजपची इतर पक्षांसोबत असलेली निवडणूकपूर्व आघाडी टिकली नाही असे सांगत भाजपने अनेक मित्र गमावले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.