Breaking News

मोदी सरकारमुळे देशात आर्थिक मंदी : प्रियंका गांधी

नवी दिल्ली
देशातील आर्थिक मंदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या धोरण कारणीभूत असल्याची टीका काँगे्रसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केली आहे.
गांधी ट्विटरदारे निशाणा साधतांना म्हटले आहे की, ’देशातील अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती फारच गंभीर स्वरूपाची आहे. त्याचा परिणाम देशातील सेवा क्षेत्र उद्योगावर होत आहे. तसेच व्यवसाय क्षेत्रात सुद्धा मंदीचा परिमाण दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा सरकार आपल्या मस्तीत आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, मोदी सरकारला हा प्रश्‍न नक्की विचारायला हवा,’ भाजप सरकारच्या कार्यकाळात कुणाचा फायदा झाला? तसेच पंतप्रधान अमेरिकेत गेले आणि आपले ’हाउडी मोदी’ केले, मात्र अमेरिकेत काम करण्यास इच्छुक भारतीय लोकांच्या एच -1 बी व्हिसा अर्ज नाकारण्यात आला आहे. अशा शब्दात प्रियांका गांधींनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अत्यंत प्रतिबंधात्मक धोरणांमुळे 2015 च्या तुलनेत यावर्षी एच -1 बी अर्ज नाकारण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अमेरिकन थिंक टँकने केलेल्या अभ्यासानुसार सुप्रसिद्ध भारतीय आयटी कंपन्यांच्या एच -1 बी अर्जांना सर्वाधिक नाकारण्यात आल्याचेही समोर आले आहे. तसेच भाजप सरकारच्या काळात कोणाला लाभ झाला असा प्रश्‍न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. भाजप सरकारच्या काळात अनेक उद्योगपतींना कोणतीही खातरजमा न करता वारेमाप कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे बँका दिवाळखोरीच्या गर्तेत उभ्या आहेत. बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढत असून, त्यावर उपाययोजना करण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका देखील गांधी यांनी केली आहे.