Breaking News

‘गुलाबी’ कसोटी व मालिकाही भारताने जिंकली

कोलकाता
कोलकाताच्या ईडन गार्डनवर मैदानावर रंगलेल्या दुसर्‍या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला 1 डाव आणि 46 धावांनी पराभूत केले. या कसोटीबरोबरच भारताने मालिका देखील जिंकली. दोन कसोटीच्या मालिकेत भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकून ही मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे.
दिवस-रात्र सामन्यात भारताने तिसर्‍या दिवशीच बांगलादेशचा खेळ खल्लास केला. दोन्ही डावात मिळून बांगलादेशचा संघ भारताने एका डावात केलेल्या 347 धावांपर्यंतही पोहचू शकला नाही. दुसर्‍या दिवशी भारतीय संघाने 9 बाद 347 धावांवर डाव घोषीत करत 241 धावांची आघाडीसह बांगलादेशला दुसर्‍यांदा फलंदाजीछए निमंत्रित केले. त्यानंतर भारताने दुसर्‍या दिवसाअखेर बांगलादेशची अवस्था 6 बाद 152 धावा अशी केली होती. भारतीय संघ ऐतिहासिक सामन्यातील विजयाच्या फार जवळ आहे. बांगलादेश अजूनही 89 धावांनी पिछाडीवर असून पुन्हा एकदा भारतीय संघ तिसर्‍या दिवशीच बांगलादेशचा खेळ खल्लास करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बांगलादेशच्या दुसर्‍या डावात ईशांत शर्माने सर्वाधिक चार तर उमेश यादवने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ माघारी धाडणार्‍या ईशांत शर्माने शादमान इस्लाम आणि मोमिनुल हकला माघारी धाडलं. ईशांतने त्यांना खातेही उघडू दिले नाही. त्यानंतत उमेश यादवने मोहमद मिथुनला 6 धावांवर माघारी धाडले. तर इम्रुल कायसला 5 धावांवर बाद करत ईशातने भारताला आणखी यश मिळवून दिले. भारतीय संघ पुन्हा एका मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ईडन गार्डन्सवरील डे-नाईट कसोटीत तिसर्‍या दिवशीही भारताचा दबदबा कायम राहिला. दुसर्‍या दिवशी बांगलादेशचा फलंदाज मुशफिकुर रहिमने संघर्ष करत टिच्चून फलंदाजी केली. 13 धावसंख्येवर चार विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशची लढाई संपल्यात जमा होती. पण रहिमने संघर्ष करत दुसर्‍या दिवसाचा खेळ होईपर्यंत सहा बाद 152 पर्यंत मजल मारुन दिली होती. आज तिसर्‍या दिवशीचा खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशच्या एकाही खेळाडूला चांगली धावसंख्या उभारता आली नाही. 41 व्या षटकात अल अमीन 21 धावा काढून बाद झाला. बांगलादेशचा नववा खेळाडू बाद झाल्यानंतर भारताला विजय मिळाला. शनिवारी जखमी झालेला महमदुल्लाह फलंदाजी करण्यसााठी मैदानात उतरला नाही. उमेश यादवने भारताकडून सर्वात जास्त 5 गडी केले.

कोहलीचा विराट विक्रम
गुलाबी कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 27 वे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हे त्याचे 20 वे शतक आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी शतके  ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ (25) आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग (19) आहेत.