Breaking News

प्रदूषणामुळे देवी-देवतांच्या मूर्तींना घातले मास्क

mask'
वाराणसी
प्रदूषण आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते आहे. देवाला या प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून भक्तांनी वाराणसीत तारकेश्‍वर मंदिरातील देवाच्या मूर्तीला मास्क लावला. देव भक्तांना सर्व संकटातून वाचवतो, अशी भक्तांची श्रद्धा असते. तरीही माणसाला हानिकारक ठरणार्‍या गोष्टींचा देवाला त्रास होतो या काळजीच्या भावनेतून भक्त देवाच्या मूर्तींची काळजी घेतात.
उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन लावतात तर हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेट पांघरवतात. गेल्या काही दिवसात वाराणसीतील प्रदूषणात वाढ झाल्यानंतर तारकेश्‍वराला प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून तारकेश्‍वराच्या मूर्तीला मास्क लावला. दरम्यान हवेतील प्रदूषण कमी व्हावे म्हणून वाराणसीच्या जिल्हा प्रशासनाने 6 नोव्हेंबरला शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी फवारले.  दुर्गा माता, काली माता आणि साईबाबांच्या मूर्तींनाही पूजा केल्यानंतर मास्क घातल्याचं त्यांनी सांगितले. गरमीमध्ये देवांच्या मूर्तींना आपण चंदनाचं लेपन करतो. तर हिवाळ्यात त्यांना स्वेटरही घालतो. जेव्हा आपण त्यांना मानवी रूपात असल्याचे मानतो तर त्यांनाही प्रदुषणाचा त्रास होत असावा. म्हणूनच आम्ही त्यांना मास्क घातलं आहे, असे पुजारी हरिष मिश्रा यांनी सांगितले.