Breaking News

म.फुले यांनी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ :राठोड

अहमदनगर/प्रतिनिधी
म. ज्योतिबा फुले यांनी 1848 साली पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. ही महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठीही शाळा सुरु केली. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. अशा महान व्यक्तीमत्वाचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

 महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत सावताश्रम शिक्षण संस्थेच्यावतीने शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, दत्ता कावरे, अमोल येवले, दत्ता जाधव, मदन आढाव, आनंद लहामगे, सोपान कारखिले, परेश लोखंडे, रावसाहेब काकडे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब काटकर, रमेश बोरबणे, शक्तीप्रसाद क्षीरसागर,  अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

 याप्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, महात्मा फुले यांनी आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी अर्पण केले. समाजातील दिनदुबळ्या, पिचलेल्या अशिक्षित समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. त्यामुळेच समाज जागृत होऊन शिक्षणाची क्रांती झाली. समाजातील परिवर्तनाची मोठी क्रांती त्यांनी केले. त्यांचे विचार आजही आपणास प्रेरणादायी आहेत, असे सांगितले.

 याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, महात्मा फुले विद्या मंदिर, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.