Breaking News

हवाबदलाने आरोग्य धोक्यात

नवी मुंबई
 डेंग्यू आणि स्वाइन आजारांना दूर ठेवण्यासाठी पालिकेच्या वतीने रुग्ण शोधक कारवाई सुरू करण्यात आली असली तरी वाढत्या सिडको वसाहतींमध्ये या मोहिमेत पालिका अपयशी ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यातच शहराला खोकला आणि श्‍वसनाच्या विकारांनी हैराण केल्याचे चित्र आहे. बदलते हवामान आणि वायू प्रदूषणामुळे खासगी दवाखान्यांमध्ये सध्या खोकल्याच्या तक‘ारी वाढल्या आहेत. सिडकोच्या जुन्या घरांमध्ये महिन्यातून धुरीकरण, औषध मवारणी, साठवणुकीच्या पाण्याची तपासणी होत होती. परंतु आता हे तीन ते चार मजली बांधकाम झाल्याने वरच्या मजल्यापर्यंत पालिका कर्मचारी पोहोचत नाहीत, त्यामुळे हा विभाग दुर्लक्षितच राहत आहे. या ठिकाणीही तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय साथीच्या रोगाचा प्रसार थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, वेळ्च्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी डासांना प्रतिबंध करू शकतात. याची तपासणी सध्या सुरू आहे; परंतु यातून नव्याने उभारण्यात आलेल्या सिडकोच्या वसाहती दुर्लक्षित केल्या जात आहेत.
नवी मुंबई महानगर पालिका डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवीत असल्याचा दावा करीत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाल्याचे समोर येत आहे.