Breaking News

आयेशा शेखला सुवर्ण

श्रीरामपूर/प्रतिनिधी

 नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय जीत कुने-डो स्पर्धेत अरमान मार्शल आर्ट अकॅडमीची विद्यार्थिनी आयेशा युनुस शेख हिने सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले. आयेशा ही डी पॉल इंग्लिश मेडिअम स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिच्या या यशाबद्दल डी पॉल इंग्लिश मेडिअम स्कूलच्या प्रिन्सिपल सिस्टर नॅन्सी, ऍडमिनिस्ट्रेचर फादर जॉन, क्रिडा शिक्षक संदीप निभे यांनी सत्कार करून कौतुक केले. हाजी निसार अहमद, शहाजहान रफिक सय्यद, बापूसाहेब तुपे, दीपक विलस्कर, राजेंद्र लड्डा, दिपाली कुलकर्णी, नवनाथ बर्डे, प्रेम चव्हाण यांनी कौतुक केले. तिला अरमान मार्शल आर्ट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक हुसेन पठाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.