Breaking News

संविधान दिनानिमित्त भिंगारमध्ये कार्यक्रम

भिंगार/प्रतिनिधी 
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 मध्ये 395 कलम असलेली 22 भाग व  8 परिशिष्ट्ये असलेली संविधान 8 परिशिष्ट असलेली घटना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली.
त्या घटनेला आता जवळपास 60 वर्षे पूर्ण झाली असून त्याचे औचित्य साधून भिंगार मधील समाजसेवक अशोक भोसले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल मधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला मानवंदना करून पुष्पहार अर्पण केला. अशोक भोसले यांनी घटनेच्या प्रस्तावना वाचन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी मोठ्या पदावर अधिकारी म्हणून काम करून सेवानिवृत्त झालो असे दारूबंदी खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी लोखंडे साहेब यांनी वक्तव्य केले. संविधाना विषयी मार्गदर्शन प्रकाश भोसले यांनी केले. यावेळी भिंगार रमाई महिला मंडळ अध्यक्ष डॉ. सीताबाई भिंगारदिवे, बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपानराव साळवे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक बाळासाहेब पतके, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट संभाजीराव भिंगारदिवे, राहुल थोरात,  विकास चव्हाण, पगारे,  साळवे, महिला मंडळ इंदूबाई थोरात, द्वारकाबाई थोरात,  जाईबाई गायकवाड, माया कांबळे,  कांबळे सिस्टर, साधना थोरात, आशाबाई साळवे व कॅन्टोन्मेंट बोर्ड  सेवक वृंद व नागरिक  उपस्थित होते.