Breaking News

ज्योतिरादित्य सिधिंया यांनी फेटाळले भाजप प्रवेशाचे वृत्त

Jyotiraditya Sindhia
मुंबई
महाराष्ट्र पाठोपाठ आता मध्यप्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पक्षाचा उल्लेख काढला आहे. पक्षाच्या जागेवर ‘समाजसेवक आणि क्रिकेटप्रेमी’ असा उल्लेख केल्याने सिंधिया आता ‘काँग्रेस’ सोडणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र ज्योतिरादित्य सिधिंया यांनी भाजप प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.
महिनाभरापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाउंटवरील बायोमध्ये बदल केला. लोकांनी केलेल्या सूचनांमुळे मी माझा बायो छोटा केला. सध्या यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही आधार नाही. असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे. महिनाभरापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाउंटवरील बायोमध्ये बदल केला. लोकांनी केलेल्या सूचनांमुळे मी माझा बायो छोटा केला. सध्या यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही आधार नाही. असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच भाजपच्या गोटात सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्य प्रदेश सरकारच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात 4 पत्रे लिहिली होती. त्यात त्यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदत आणि राज्यातील रस्त्यांची डागडुजी करण्याची सूचना केली होती. एवढेच नाही तर नोव्हेंबरमध्येही सिंधिया यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून दातिया येथील नागरिकांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.