Breaking News

बनावट नोटा पकडल्या

अहमसनगर/प्रतिनिधी 
नगर-सोलापूर महामार्गावरील श्रीगोंद्यातील मांडवगण फाटा येथे एका वाहनातून दोन हजार व पाचशे रुपयांच्या २ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीच्या नोटा पोलिसांनी सापळा रचून पकडल्या. बनावट नोटा बाळगणाऱ्याला एकाला पोलिसांनी अटक केली. या बनावट नोटा देऊन सोने खरेदी करायचे होते. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अतुल रघुनाथ आगरकर (वय २६ रा. जवळवाडी-सुपा, पारनेर) याला अटक करण्यात आली.