Breaking News

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

महाराष्ट्रात रविवारी दिवसभर घडलेल्या विविध घडामोडीमधून सत्तेसाठी राजकीय मंडळी कमरेचेही सोडून हैदोस घारतात याचा तमाशा महाराष्ट्राने पाहीला. एखाद्या गोष्टीची हवस पुर्ण करण्यासाठी आतूर झालेला प रिणामांची पर्वा करीत नाही.तोच प्रकार दिवसभर पहायला मिळाला.कामातूर आणि सात्तातूरांमध्ये आता फार अंतर राहीले असे दिसत नाही. तत्व, निष्ठा या गोष्टी राजकारणात उल्लेखापुरात्याही शिल्लक उरल्या  नाहीत.भाजपाच्या वळचणीला गेलेले अजित पवारही त्याच पंक्तीत जाऊन बसल्याने महाराष्ट्रातही उत्तर भारतीय राजकारणाचे वारे जोरदार वाहू लागल्याची जाणीव होऊ लागली आहे.अर्थात या सर्वनाट्याच्या कें द्रस्थानी कालही शरद पवार होते, आजही आहेत आणि उद्याही तेच असातील याविषयी जाणकारांना तिळमाञ शंका नाही. नैतिकतेचा गप्पा मारून लोकशाहीचा मुडदा पाडणार्‍या प्रवृत्तींना शरद पवार हेच मात  देतील. त्यांची जागा दाखवतील, हाच सर्व घडामोडींचा सार आहे.

अर्थातुराणां न सुखं न निद्रा, कामातुराणां न भयं न लज्जा ।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा,  क्षुधातुराणां न रुचि न बेला ्॥

अशा अर्थाचे एक सुभाषित संस्कृतमध्ये आहे.त्यात थोडासा बदल करून सत्तातुराणां न भयं न लज्जा असे म्हणण्यास सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुरेसा वाव आहे. कालचे महाभ्रष्टाचारी ठरलेले सिंचन  घोटाळ्यातील संशयीत एका राञीत उपमुख्यमंञी म्हणून शेजारी बसवून घेणे, महाविकास आघाडीवर आमदारांना डांबून ठेवण्याचा आरोप करून नैतिकतेचे उसने अवसान कर्नाटक नाट्यात आमदारांना मुंबईत डाबून  ठेवणार्‍यांनी आणावे, कालपरवापर्यंत सरकार स्थापन करणार नाही असा आव आणणारे दगाफटका करून अंधारात शपथ घेतात.अशा परिस्थितीत सत्तेसाठी नागडे होऊन  नाचणारे कामातूर वासनांध प्रवृत्तीपेक्षाही  निच आहे अशीच महाराष्ट्राची भावना बनली आहे. काल परवापर्यंत  भाजपाच्या नजरेत अजित पवार हे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख संशयीत होते.सत्तर हजार कोटींचा घोटाळा पवारांनी केला.त्यांना जेलमध्ये टाक ल्याशिवाय राहणार नाही.अशी वल्गना प्रत्येक भाजपेयी करीत होता.त्यांनाच सोबत घेऊन सरकार बनविण्याचा प्रयत्न करणे,नव्हे थेट उपमुख्यमंञी बनविणे यासारखी साधनशुचिता दाखविणारे काममातूर पुरू षापेक्षाही भयानक म्हणावे लागतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार यांना जेल मध्ये टाकण्याचे बोलत होते आणि आत्ता त्याच अजित पवारांना उराशी कवटाळून उपमुख्यमंत्री बनवले. तर मग  त्यांच्यावरील असणार्‍या आरोपांचा काय होणार?
खरंतर अजित पवार यांच्यावर आणखीही काही गंभीर आरोप आहेत.ते त्यांचा पाठलाग सोडत नाहीत. यापैकी सगळ्यात मोठा आणि चर्चेचा घोटाळा म्हणजे ‘सिंचन घोटाळा.’ बीजेपी ने वेळोवेळी सिंचन  घोट्याळ्याप्रकरणी अजित पवारांना धारेवर धरले आहे. 2010 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाले होते आणि त्यामध्ये अजित पवारांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.  त्यानंतर 2 वर्षांनी त्यांना घोटाळा करण्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 2018 मध्ये महाराष्ट्र एंटी करप्शन ब्यूरो कडून अजित पवारांना 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन  घोटाळ्याप्रकरणी आरोपी ठरवले होते.

बँक डायरेक्टर असताना झाला होता आरोप
अजित पवार महाराष्ट्र कोऑपरेटिव बँकेचे डायरेक्टर असताना त्यांच्यावर आरोप होता की, बँकेने अनेक साखर कारखान्यांना कमी दरात कर्ज दिले होते. नंतर गिरण्यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केले.  तसेच  मालमत्तांची विक्री करणे, स्वस्त कर्जे देणे आणि ते परत न भरल्यामुळे 2007 ते 2011 दरम्यान बँकेला सुमारे 25 हजार कोटींचे नुकसान झाले असा आरोप आहे.

अजित पवारांवर चालू असलेले खटले
कलम 406 नुसार, विश्‍वासाचा गुन्हेगारीचा भंग, कलम 409 नुसार, फसवणूक करणारा व्यावसायिका, कलम 420 नुसार, फसवणूक आणि बेईमानी, कलम 465 नुसार, फसवणूक, कलम 467 नुसार, मोठ्या  पैशासाठी फसवणूक , देवेंद्र फडणवीस सहित बीजेपीच्या सर्व नेत्यांनी आपल्या भरसभेत सगळ्यांसमोर अजित पवार यांना जेल मध्ये पाठविण्याची भाषा करत होते. परंतु आता सत्तेसाठी सगळं विसरून एकत्रित  सरकार बनविले आहे.ही कुठली नैतिकता अन् साधन शुचिता?

रामप्रहराचा निर्लज्ज दावा
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज निर्माण झालेली परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती.किंबहूना गेल्या पाचसहा वर्षात जेंव्हा जेंव्हा राज्यघटनेची मोडतोड झाल्याचे जे जे आरोप झालेत त्यात महाराष्ट्रात  झालेला विद्यमान प्रकार सर्वाधिक भयंकर मानावा लागेल.एका राञीत लोकशाहीचा खुन करण्याचा हा प्रकार आहे.मागच्या दाराने सत्ता मिळविण्याचा छञपतींच्या महाराष्ट्रात घडला आहे.फुले शाहु आंबेडकरांच्या  विचारांच्या महाराष्ट्रात केलेल्या या कृष्णकृत्याला गनिमी कावा संबोधून आपल्या पापावर पांघरूण घालण्याचा साळसूदपणा नैतिकतेचे ठेकेदार दाखवू पहात आहेत.यापलिकडे जाऊन साधनशुचितेचे उसने अवसान  आणणार्‍या प्रवक्त्याने तर रामप्रहरचा उल्लेख करून निर्लज्जपणाचा कळस केला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला झोपेत ठेवून राजभवनावर शपथ घेतली.महाराष्ट्राचीच नव्हे तर देशात कुठल्याही राज्याची ही परंपरा नाही.सरकारचा शपथविधी हा एक सोहळा असतो.जनता या सोहळ्यात  प्राति निधीक स्वरूपात हजर असते.राज्याचा हा सार्वजनिक सोहळा लोकशाहीचा उत्सव म्हणून खरेतर साजरा करण्याची प्रथा आहे.यंदा माञ या परंपरेला अमानूषपणे छेद दिला गेला.या राज्याच्या  मुख्यमंञ्यांनी,उपमुख्यमंञ्यांनी शपथ घेतली ही गोष्ट जनतेला माहीत नाही.हे पहिल्यांदाच घडलं आहे.महाराष्ट्राच्या भल्यासाठी सरकार स्थापन करण्याचा हेतू शुध्द होता तर मग गुपचुप कार्यभार उरकून का घेतला?  मनात कुठल्याही प्रकारचे  पाप नव्हते तर एखाद्या चोराप्रमाणे हालचाली का केल्या? या प्रश्‍नांची सरळ उत्तरं देण्याऐवजी राम प्रहर असा जप शेलारमामांनी लावला आहे.रामप्रहरात चांगली कामे केली जातात.असा  युक्तीवाद करून महाराष्ट्राला अंधारात ठेवून केलेल्या कृत्याचे समर्थन करीत आहे.क्षणभर त्यांचा हा युक्तीवाद मान्यही केला तरी एक प्रश्‍न संशयाचे ढग गडद करातो.23 नोव्हेंबरची रामप्रहर हा एकच मुहूर्त होता का?  महाराष्ट्राला विश्‍वासात घेऊन रविवारच्या रामप्रहरातही शपथ सोहळा होऊ शकला नसता का? असो! सत्तेसाठी हपापलेल्यांना या भावना कशा समजणार?

अजित पवारांची खेळी की हतबलता?
महाराष्ट्रात निर्माण झालेला राजकीय तिढा आणखी गंभीर होण्यास अजित दादा पवार यांची फंदफितूरी कारणीभूत ठरली आहे.अजित पवार व्यक्ती म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह शरद पवार  यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते म्हणून अजित पवार यांच्या फंदफितूरीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.अजित पवार यांच्यासारखा नेता भाजपाबरोबर जाण्याचा निर्ण घेतो आणि हा निर्णय शरद  पवारांना माहीत नसतो ही बाब या ठिकाणी वेगळ्या अर्थाने गंभीर ठरते.हा निर्णया घेण्याचे धाडस अजित पवार यांनी केले याचा अर्थ एक तर त्यांना भाजपाकडून ब्लकमेल केले असावे किंवा राजकारणातील अनाक लनीय चाल खेळण्यासाठी पवार या भुमिकेत गेले असावे अशीही वंदता आहे.दुसर्‍या शक्यतेला खुद्द शरद पवारांचा पाठींबा असू शकतो अशीही चर्चा ऐकायला येत आहे.कारण काहीही असो सत्तेच्या लोभात भारतीय  जनता पक्षाने राष्ट्रवादीसाठी लावलेल्या सापळ्यात भाजपा स्वताःच फसली असल्याचे सध्यातरी दिसत आहे.अर्थात सत्तेसाठी काहीपण...हेच ध्येय असलेल्या सत्तातुराणांना पराभवाचे भय नाही त्याहूनही लाज तर अ जिबात वाटणार नाही.