Breaking News

जीवन जगण्याचे धडे निसर्गाकडून घ्यावे : कोहिनकर

अहमदनगर/प्रतिनिधी
“ विद्यार्थ्यांनी मौज, मस्ती व मजा करत जीवन जगण्याचे धडे निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा आनंद घेतला. जीवन निरोगी, सुदृढ कसे राखता येईल, या गोष्टीकडे शिक्षणाबरोबर लक्ष दिले पाहिजे’’, असे प्रतिपादन ज्ञानतीर्थ इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा सीमा कोहिनकर यांनी केले.
येथील नगर-सोलापूर रस्त्यावरील शिराढोण गावातील ज्ञानसमृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरण येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यानंतर दर्याबाई पाडळी, कोरठण खंडोबा या देवस्थानांनाही भेटी दिल्या. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकगीत, हिंदी गीते, मराठी गाणे, भेंड्या खेळत सहलीचा आनंद लुटला. या सहलीत अध्यक्षा सीमा कोहिनकर, सागर बेहळे, नितीन जाधव, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र शिंदे आदींसह विद्यार्थी  सुमीत देवकर, अतीश काळे, तेजस्विनी बोराटे, अनन्या पवार, अनुष्का चौरे, साहील पठाण, चैतन्य सोनवणे, रेहान पठाण आदी उपस्थित होते.