Breaking News

राजकारण्यांनी वार्‍यावर सोडलेल्या शेतकर्‍यांसाठी मराठमोळ्या क्रिकेटपटूनं घेतला पुढाकार!

Ajinkya_Rahane
पुणे
महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसामुळं शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे हतबल झालेला शेतकरी मदतीच्या आशेवर असताना दुसरीकडे राजकारण्यांचा सत्ता स्थापनेवर डोळा आहे. महाराष्ट्रातील काही भागात शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत भारताचा मराठमोळा क्रिकेटपटू शेतकर्‍यांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

अवकाळी पावसामुळं पीकांचे नुकसान होत असताना हतबल शेतकर्‍यांसाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं मदतीचा हात पुढे केला आहे. पुण्याच शिवार संवाद या कार्यक्रमात अजिंक्य रहाणेनं शेतकर्‍यांच्य सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांना मदत करा, असे आवाहनही केले. या कार्यक्रमात अजिंक्य रहणेनं, शेतकर्‍यांच्या कष्टामुळं आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं. त्यामुळं त्यांना आपण नेहमी मदत केली पाहिजे. मला जेव्हा कधी संधी मिळते. मी त्यांच्या मदतीसाठी काय तत्पर असतो. सध्या अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे, असे मत व्यक्त केले.

एकीकडे सोशल मीडियावर फक्त शेतकर्‍यांबद्दल मत व्यक्त करणारे खुप असतात. मात्र बाहेर पडून शेतकर्‍यांन खरी मदत करणारे कमी असतात. याआधी अजिंक्य रहाणेनं सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीत लोकांना मदत केली होती. त्यावेळी ही रहाणे पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला होता. आताही शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तो धावून आला आहे.

‘क्रिकेटमध्ये जसा टॉस अनिश्‍चित तसा पाऊस’

शेतकर्‍यांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना रहाणेनं, क्रिकेटमध्ये टॉस कोण जिंकणार हे आपल्या हातात नसते. टॉस जिंकलो तर फायदा होतोच आणि हरलो तर मार्ग काढावा लागतो. शेतकर्‍यांची परिस्थीतीही तशीच आहे. आता अवकाळी पावसामुळं त्यांच्यावर संकंट आहे. पण आपल्याला मार्ग काढालया हवा, असे सांगितले. तसेच, लहानपणापासून मला शेतकर्‍यांसाठी काही तर करायचे होते, आता संधी मिळाली आहे. त्यामुळं शेतकर्‍यांसाठी जमेल ते मी करेन, असेही तो म्हणाला.

‘शेतकर्‍यांना मदत करायला कधीच विसरू नका’

या कार्यक्रमादरम्यान शेतकर्‍यांना मदत करण्याचे आवाहनही रहाणेनं केले. तसेच, आपल्या ताटात जे अन्न येते ते शेतकर्‍यांमुळे. शेतकरी अहोरात्र मेहनत करताता त्यानंतर आपल्याला दोन घास खायला मिळतात. मी हॉटेलमध्ये किंवा घरी कुठेही असेन तेव्हा मला जाणीव असते की शेतकर्‍यामुळं मला अन्न मिळत आहे, असे सांगितले.