Breaking News

पाथर्डीमध्ये म.फुले यांना अभिवादन

पाथर्डी/प्रतिनिधी
क्रांतिसूर्य समाज सुधारक महात्मा जोतीबा फुले यांचा १२९ वा स्मृतिदिन शहरातील महात्मा फुले सभागृह येथे साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्राध्यापक शेखर ससाणे,पाडुरंग सोनटक्के,गणेश सोनटक्के,बबन पुंड,देविदास शिंदे,महेश केरकळ,सचिन शिंदे,रवींद्र साखरे,राजेंद्र सोनटक्के,शशिकांत साखरे,नारायण लगड,दीपक गादे,बंडू तुपे,गणेश सोनटक्के, प्रा.शेखर ससाणे आदी उपस्थित होते.

  महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी देशात सर्व प्रथम स्त्रियांची शाळेची सुरवात केली. एक थोर समाज सुधारक, तत्वज्ञ म.फुले यांनी 'शेतकऱ्याचा आसूड' ग्रंथाद्वारे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दुर्दशेचे वर्णन केले.  शेतकरी आत्महत्या तसेच शेतकरी पिळवणूक आणि फसवणूक या सारख्या समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या विचारांची  गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.अनिल पानखडे यांनी केले.