Breaking News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात चार ठार

रायगड
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे जाणार्‍या भरधाव कारने टँकरला मागून जोरदार धडक दिली. यात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.  कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त कार सातारा येथून लग्न समारंभ आटोपून मुंबईकडे परतत होती. अपघात एवढा भीषण होत की अपघातग्रस्त कारचा चेंदामेंदा झाला आहे.