Breaking News

नारायण राणेंना विधानपरिषदेत आणण्याची भाजपची खेळी

मुंबई
राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजपानं रणनीती आखण्यास सुरुवात केली असून महाविकासआघाडीपुढे मोठे आव्हान भाजपाच्या रूपात उभे राहणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला करत शिवसेनेवर काल पहिला बाण सोडला. देवेंद्र फडणवीस भाजपाचे विधिमंडळातील गटनेते असल्यानं त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा असेल. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल. यासोबतच विधानपरिषदेतही शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे. भाजपाचे आव्हान पेलून पुढील पाच वर्ष शिवसेना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कशी निभावते हे पाहणे महत्वाचे आहे.दरम्यान, भाजपाकडून शिवसेनेला सळो की पळो करणारा नेता भेटला असून शिवसेनेवर कायम तोंडसुख घेणारे आणि ठाकरे कुटुंबावर नेहमी तुटून पडणारे नारायण राणे यांना विधानपरिषदेत आणण्याच्या दृष्टीनं भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिल्लीतील भाजपा नेत्यांशी संपर्कदेखील साधण्यात आला आहे. मागील काळात नारायण राणे यांची ओळख कडवे शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे. परंतु नारायण राणे आता ठाकरे कुटुंबाचे कडवे टीकाकार मानले जातात.
नारायण राणे यांना शिवसेना मुळापासून परिचित आहे त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही बाजू नारायण राणेंना माहित असल्याने शिवसेनेला घेरण्यासाठी त्यांना सोपे जाईल. भाजपाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त टीका राणे कुटुंबाकडून ठाकरेंवर केली जाते. त्यामुळेच त्यांना विधानपरिषदेत आणून शिवसेनेसमोर अडचणी निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न यशस्वी ठरणार का हे पहावे लागणार आहे विरोधी बाकावरच समाधान मानावे लागणार आहे. आता राज्यात स्थापन झालेल्या सरकारला घेरण्यासाठी भाजपानं रणनीती आखण्यास सुरुवात केली असून महाविकासआघाडीपुढे मोठे आव्हान भाजपाच्या रूपात उभे राहणार आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला करत शिवसेनेवर काल पहिला बाण सोडला. देवेंद्र फडणवीस भाजपाचे विधिमंडळातील गटनेते असल्यानं त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा असेल. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल. यासोबतच विधानपरिषदेतही शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे. भाजपाचे आव्हान पेलून पुढील पाच वर्ष शिवसेना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कशी निभावते हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान, भाजपाकडून शिवसेनेला सळो की पळो करणारा नेता भेटला असून शिवसेनेवर कायम तोंडसुख घेणारे आणि ठाकरे कुटुंबावर नेहमी तुटून पडणारे नारायण राणे यांना विधानपरिषदेत आणण्याच्या दृष्टीनं भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिल्लीतील भाजपा नेत्यांशी संपर्कदेखील साधण्यात आला आहे. मागील काळात नारायण राणे यांची ओळख कडवे शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे.