Breaking News

आम्ही विरोधी पक्षातच बसणार : शरद पवार

मुंबई
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रपरिषदेत शिवसेनेचा घेतलेला समाचार आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेलं तिखट उत्तर यामुळे युतीचे संबंध आणखीच ताणले गेले. आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत, असं शिवसेना नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना सत्तास्थापनेसाठी अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
अयोध्या प्रकरणाच्या निकालासंबंधात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. अयोध्येच्या निकालावरून महाराष्ट्रातलं राजकारण बदलण्याची शक्यता नाही. दोन-तीन दिवसात लोक विसरून जातील, बहुधा हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा विषय नसेल. असं पवार म्हणाले. राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्यास विलंब झाल्यावर पवार यांनी भाजपने दावा करावा, बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेनं कौल दिला आहे. लोकांच्या आदेशानुसार ते आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची संधी कधी देतील याची आम्ही वाट पाहत आहोत, जनतेच्या आदेशानुसार आम्ही विरोधी बाकावरच बसणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेला पाठिंबादेणार का? यावर उत्तर देतांना पवार म्हणाले की, या विषयावर त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झाली नाही. तसेच आरोप प्रत्यारोप करून एकमेकांना खोटे ठरवू नका, चर्चा करून सत्ता कशी स्थापन करता येईल याबाबत चर्चा करा. असा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान, अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, यामुळे देशासमोर जी गंभीर समस्या होती. यावर तोडगा काढण्यासाठी नक्कीच मदत होईल. मी या देशातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की, एक महत्वपूर्ण निकाल आलेला आहे, याचे स्वागत व सन्मान सर्वांनीच करायला हवा. तसेच, देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले.