Breaking News

मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

अहमदनगर/प्रतिनिधी

  युवक-युवतींना स्पर्धा परिक्षांचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी गरुड झेप करिअर अकॅडमीच्या वतीने शहरात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर व महापरीक्षेचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले आहे. युवकांना शासकीय नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात संधी असून, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन अकॅडमीचे प्राध्यापक आशीर्वाद चव्हाण यांनी केले आहे.