Breaking News

आरे कार शेडच्या कामाला स्थगिती

मुंबई/प्रतिनिधी 
आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी झपाटयाने कामाला सुरवात केली आहे. मंत्रालयातील पत्रकार कक्षाला भेट दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याच वेळी त्यांनी मेट्रोच्या कामाला नव्हे तर मी आज आरे येथील कार शेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याचं सांगितलं. पत्रकारांनी वर्षा बंगल्यावर रहायला जाणार का असा प्रश्‍न विचारला त्यावेळी त्यांनी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या मी करेन असे सांगितले. तिथं ज्यावेळी जावं लागेल तेव्हा जाईल असं त्यांनी सांगितलं.