Breaking News

उक्कलगावमध्ये खंडोबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

उक्कलगाव/प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव-कोल्हार रस्ता खंडोबा चौकात असलेल्या खंडोबा महाराजांच्या  नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य मंदिराचा कलशारोहन सोहळा सोमवारी चंपाषष्ठीच्या  शुभमुहूर्तावर पार पडणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संरपच नितीन थोरात यांनी दिली.

  या पुरातन खंडोबा मांदिराची दुरवस्था झाली होती. भाविकांनी व ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेऊन लोक वर्गणीतून नवीन मांदिर बांधण्याचा संकल्प केला व तो पूर्णत्वास नेला. या निमित्ताने रविवारी  दुपारी 4 वाजता नूतन मूर्तीची मिरवणूक,  सोमवारी सकाळी 7:30 वाजता ग्रामदैवत श्री हरिहर गोविंद महाराज पाद्यपूजन व अभिषेक करुन खंडोबा महाराजांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. तर दुपारी 4 वाजता हभप उद्धव मंडलिक यांच्या हस्ते कलशारोहणाचे पूजन होईल. तसेच सांयकाळी ६ वाजता कोटमा भरला जाईल, त्यानंतर 7 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन रात्री 9 वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडणार आहे.