Breaking News

शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग

 २६ पर्यंत पोलिस कोठडी

जामखेड/प्रतिनिधी
शिक्षकानेच आपल्या वर्गातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी बरोबर अश्लील चाळे केल्याचा प्रकार

तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा येथे घडला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संभाजी कोंडीबा सरोदे,( रा जामखेड) या शिक्षक आरोपीलास पोलिसांनी विनभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

   पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: आरोपी शिक्षक संभाजी कोंडीबा सरोदे (रा.जामखेड) हा धोंडपारगाव येथील दत्तवाडी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. शनिवारी (दि २३) सायं. ५ वाजता आरोपी शिक्षक संभाजी सरोदे हा नान्नज वरून जामखेडकडे चारचाकी गाडीने येत होता. यावेळी राजेवाडी फटा येथे ही विद्यार्थीनी रस्त्याच्याकडेला घरासमोर खेळत होती. यावेळी या शिक्षकाने त्या विद्यार्थीनीस हाक मारून चारचाकी गाडीत बसवले व राजेवाडी येथील शाळेत घेऊन गेला व विनयभंग केला. सदरची घटना मुलीने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याच वेळी आरोपी शिक्षक पळून जात आसताना ग्रामस्थांनी त्यास पकडले व चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पिडीत मुलीच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संवर्धन अधिनियम २०१२ च्या कलम नुसार शिक्षक संभाजी सरोदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असुन श्रीगोंदे न्यायालय हजर केले असता न्यायालयाने त्यास २६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.