Breaking News

राज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ : संजय राऊत

Sanjay Raut
मुंबई
राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थान व्हावे, यासाठी मुख्य भूमिका निभावत असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांनी पुन्हा सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असून, राज्यात लवकरच स्थिर सरकार देऊ अशी ग्वाही दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्तावाटपावरून भाजपवर शिवसेनेकडून पहिली तोफ खासदार संजय राऊत यांनी डागली. त्यानंतर सातत्याने ते समसमान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत राहिले. भाजपकडून मुख्यमंत्रिपद देण्यास नकार आल्यानंतर अखेर शिवसेनेनं त्यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी संजय राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मिशन मुख्यमंत्रीसाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता. शेवटी कोणीच सरकार स्थापन करू न शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. गृह मंत्रालयाने म्हटले की, ही घोषणा संविधानाच्या कलम 356(1) नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू होईल. हा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालानंतर घेण्यात आला. यामध्ये कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास समर्थ नाही असे म्हटले होते.